कराड सोलर ऊर्जा
कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनब्रेकिंगराज्यसातारा

कराड बाजार समिती वार्षिक सभा : उंब्रजला व्यापारी संकुल तर मसूरला पेट्रोल पंपास हिरवा कंदील

कराड (हॅलो न्यूज) – कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या विकासाला आणखी गती देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. उंब्रज उपबाजार आवारातील जुनी कार्यालयीन इमारत पाडून त्या ठिकाणी सुसज्ज नवीन इमारत व व्यापारी संकुल उभारण्याचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. तसेच मसूर उपबाजार आवारातील खुल्या जागेत पेट्रोल पंप आणि व्यापारी संकुल उभारण्याच्या प्रस्तावालाही सभेने मंजुरी दिली.

कराड येथील मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनच्या हॉलमध्ये बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कोयना सहकारी बँकेचे संचालक व युवानेते आदिराज पाटील, रयत संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा.धनाजी काटकर, सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे यांच्यासह संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती. सभेत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

सभेला खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, व्हा. चेअरमन जगन्नाथ मोरे, कोयना दूध संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, कोयना सहकारी बँकेचे चेअरमन के. टी. पाटील, व्हा. चेअरमन साहेबराव शेवाळे, कोयना वाहतूक संस्थेचे चेअरमन तुकाराम पाटील, शामराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन शहाजीराव शेवाळे यांच्यासह बाजार समितीचे संचालक प्रकाश पाटील, संभाजी चव्हाण, संभाजी काकडे, जे. बी. लावंड, मनुभाई पटेल, दयानंद पाटील, मानसिंगराव जगदाळे, सर्जेराव गुरव, उद्धव फाळके, सोमनाथ जाधव, राजेंद्र चव्हाण, गणपत पाटील तसेच तालुक्यातील पदाधिकारी, शेतकरी, मतदार, आडते, व्यापारी, हमाल-मापाडी उपस्थित होते.

सभेचे सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी केले. प्रास्ताविक सभापती सतीश इंगवले यांनी केले. तर प्रभारी सचिव आबासो पाटील यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. उपसभापती नितीन ढापरे यांनी आभार मानले. सभा यशस्वी करण्यासाठी बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close