कराड सोलर ऊर्जा
कृषीक्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनब्रेकिंगराज्यसांगलीसातारा

मंडलाधिकारी 3 हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडला

सातारा, (हॅलो न्यूज ): खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुसेगाव (ता. खटाव) येथील मंडलाधिकारी किशोर नंदू खटावकर (वय 43) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि. 5) पुसेगाव ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर करण्यात आली. याबाबत 32 वर्षीय पुरुषाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

तक्रारदाराने मौजे धावडदरे (काटगुण), ता. खटाव येथील जमीन खरेदी केली होती. या खरेदी दस्ताची नोंद करण्यासाठी त्यांनी संबंधित तलाठ्यांकडे अर्ज केला होता. त्यानुसार नोंद घेऊन ती प्रमाणित करण्यासाठी मंडलाधिकारी कार्यालयाकडे ऑनलाइन पाठविण्यात आली होती. दरम्यान, तक्रारदाराने खरेदी दस्ताच्या नोंदीसाठी मंडलाधिकारी किशोर खटावकर यांची भेट घेतली. नोंद प्रमाणित करून मंजूर करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सोमवारी एसीबीच्या पथकाने पुसगाव ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर सापळा रचला. यावेळी मंडलाधिकारी किशोर खटावकर यांनी तक्रारदाराकडून तीन हजार रुपये स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथकाने त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक सुनील दाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक शैला कोरडे यांनी पर्यवेक्षण केले. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close