kota acadamy karad
औरंगाबादकृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेब्रेकिंगमनोरंजनमराठवाडासंभाजीनगर

साहित्य क्षेत्रासाठी धक्का : कवी, गीतकार ना. धों. महानोर यांचे निधन

पुणे। ज्येष्ठ साहित्यिक, कवी, गीतकार ना. धों. महानोर (वय- 81) यांचे निधन झाले आहे. पुण्यातील रुबी रुग्णालयात सकाळी साडेआठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साहित्य क्षेत्रासाठी ही एक अत्यंत दुःखद बातमी आहे. ना. धो. महानोर यांना 1991 साली पद्मश्रीने गाैरविले होते.

निसर्गकवी ना. धों. महानोर यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. मराठी साहित्य क्षेत्रात ते निसर्गकवी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव राहिला. उद्या पळसखेड या त्याच्या मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

गीतकार म्हणून ना. धों. महानोर यांची ‘अवेळीच केव्हा दाटला अंधार’, ‘आम्ही ठाकर ठाकर’, ‘मी रात टाकली’, ‘मी कात टाकली’, ‘घन ओथंबून येती, नभ उतरु आलं’ ही त्यांची गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत. सन 2000 साली साहित्य अकादमीने गाैरविण्यात आले होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close