Satara News : मोकाशी काॅलेजजवळ सडलेला मृतदेहाचा सागाडा आढळला, घातपत?

सातारा | राजमाची (ता. कराड) येथील मोकाशी पाॅलीटेक्नीक काॅलेज जवळ अनोळखी इसमाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. सदरील मृतदेह पुरूष की स्ञी जातीचा आहे, याबद्दल अद्याप खाञी नसून कराड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या मृतदेहामुळे कराड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कराड- विटा मार्गावर असलेल्या मोकाशी काॅलेजजवळ सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. डीवायएसपी अमोल ठाकूर व कराड शहरचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, पीएसआय राज पवार यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. सदरील घातपात झाला असल्याचा काहींनी संशय व्यक्त केला आहे. याबाबत पोलिस अधिक माहिती घेत असून अद्याप कोणतीही ठोस माहिती हाती आलेली नाही.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड- विटा मार्गावर असलेल्या मोकाशी काॅलेजच्या पाठीमागील बाजूस अोढ्याजवळ एक सांगडा आढळला आहे. सदरील सांगडा खूप दिवसापूर्वीचा आहे, त्यामुळे त्याचे पोस्टमार्टमही करता येणार नाही. मात्र, जोपर्यंत या सांगाड्याची अोळख पटत नाही, तोपर्यंत घातपात की मृत्यू याबाबत काहीही सांगता येणार नाही.