Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

युवतीचे अपहरण, अत्याचार : कोरेगाव तालुक्यातील 7 जणांवर पोक्सो

वाई | वाई तालुक्यातील एका गावातील 16 वर्षांच्या युवतीचे अपहरण, बळजबरीने विवाह करून अत्याचार करणाऱ्या 7 जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेली संशयित आरोपी कोरेगाव तालुक्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  वाई तालुक्यातील एका गावातील युवतीला कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी येथील हिरेश शंकर शिंदे याने आपण देवदर्शनासाठी जायचे आहे, असे सांगून तिचे अपहरण केले. त्या युवतीला एका मंदिरात नेऊन तिच्या मनाविरुद्ध विवाह केला. तेथून तिला सर्कलवाडी येथे घेऊन जाऊन तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

या प्रकरणी कमलाबाई जाहिरे, अंबिका जाहिरे, चत्राप्पा जाहिरे, राजाराम जगदाळे, रेखा शाहू, सिद्धाप्पा शिंदे या सात जणांवर भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कोरेगाव व वाई तालुक्यात खळबळ उडाली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close