कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

कोयना सेवक संस्थेच्या चेअरमनपदी उमेश पाटील तर सरिता थोरात व्हाईस चेअरमन

मसूर प्रतिनिधी। गजानन गिरी
खोडशी (ता. कराड) येथील कोयना मध्यवर्ती दुग्धालय सेवक सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी उमेश पाटील, तर व्हाईस चेअरमनपदी सौ. सरिता थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक कार्यालयाचे व्ही. एस. मोरे यांनी काम पाहिले. संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल संघाचे कार्यकारी संचालक अमोल गायकवाड व डेअरी मॅनेजर श्रीकांत हणबर यांच्या हस्ते नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे सर्व संचालक, सर्व सभासद, पदाधिकारी यांनीही अभिनंदन केले. संस्थेचे संचालक दिलीप कदम, प्रशांत थोरात, डॉ. अजित शिंदे, रविराज जाधव, कीर्ती रामगुडे, विजय शिंदे, दिगंबर येडगे, सौ अर्चना सपकाळ उपस्थित होते. संस्थेचे सचिव सयाजीराव मोहिते यांनी स्वागत केले. जालिंदर थोरात यांनी आभार मानले.

संस्थेच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील राहू..।
सर्व सभासद व संचालकांना विश्वासात घेऊन संस्थेच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू अशी ग्वाही, संस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन उमेश पाटील व व्हाईस चेअरमन सौ. सरिता थोरात यांनी दिली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close