आर्यन पब्लिक स्कूलचे यश :- कराडच्या प्री सेकंडरी शिष्यवृत्ती परीक्षेत डंका कायम


कराड :- कराड येथील विद्यार्थ्यांनी प्री सेकंडरी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी 2025-26 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जाहीर करण्यात आलेल्या अंतरिम निकालात अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत क्लासचा गौरव वाढविला. एकूण 22 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. शाळेच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे हे यश मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. अंतिम गुणवत्ता यादीमध्येही विद्यार्थ्यांना उत्तम स्थान मिळेल, असा विश्वास संस्थेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
या परीक्षेत पवार वरद बजरंग याने ३०० पैकी २५४ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच पाटील एकता राजेंद्र हिने २९८ पैकी २४८ गुण, चव्हाण प्राची विवेक हिने २२० गुण, चोथे वेद विजय याने २२० गुण, कापरे सार्थक नितीन याने २२० गुण, पोटे आराध्य गौराम २१२ गुण, पवार अधिराज अरुण २१० गुण, पवार विराज अमित २०८ गुण, तोरणे उत्कर्ष विकास २०२ गुण, जाधव सोहम नवनाथ २०० गुण, इंगवले शिवराज सुनील १९४ गुण, खैरातखान सिद्दीक इर्शाद १९४ गुण, साळुंखे सार्थक गजानन १९२ गुण, स्वामी सोहम मिलिंद १९० गुण, शिद विराज संतोष १७४ गुण, सुतार सोहम संतोष १७२ गुण, मोरे स्वराज सुनील १६० गुण, खवळे आर्यन सुरेंद्र १५४ गुण, सावंत शंभूराज उमेश १५० गुण, चिंचकर आर्विन विनायक १४४ गुण, गाडे आराध्या जगदीपकुमार १४२ गुण, इनामदार इकरा इक्बाल १४२ गुण मिळवून विशेष यश संपादन केले.
नुकत्याच झालेल्या एसपीआय परीक्षेत येथील विद्यार्थिनी स्वानंदी प्रकाश गोरड हिने यश संपादन करून महाराष्ट्रातील ३० विद्यार्थिनींमध्ये एसपीआय नाशिक येथे निवड मिळवली. दहावी बोर्ड परीक्षेत देखील येथील आदित्य वैभव कदम हा विद्यार्थी ९८% गुण मिळवून प्रथम आला. त्याचबरोबर स्वानंदी प्रकाश गोरड, मणेर आयिशा आबिद, निकम संजीवन संजय, मावळे वेदिका विवेकानंद यांनी देखील ९८% गुण संपादित केले आहेत. ९०% पेक्षा जास्त गुण १८ विद्यार्थ्यांनी मिळवले आहेत.
एक जूनपासून वर्ग सुरू
शालेय विद्यार्थ्यांना विविध परीक्षांमध्ये दैदीप्यमान यश मिळवून योग्य मार्गदर्शन करणारा हा क्लास कराडच्या शैक्षणिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. १ जूनपासून वर्ग सुरू होत असून प्रत्येक बॅचमध्ये केवळ ४५ विद्यार्थी घेतले जातात. त्यामुळे मोजकेच प्रवेश शिल्लक असून पालकांनी त्वरित आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



