क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

BREAKING NEWS : पुणे- बेंगलोर महामार्गावर कराडजवळ टायर गोडावूनला भीषण आग

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पुणे- बेंगलोर महामार्गावर जुने टायर स्क्रॅप गोडावूनला रात्री उशिरा 11 वाजता भीषण आग लागली. कराड जवळ गोटे गावच्या हद्दीत आग लागली असून अग्निशमाक दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तब्बल दीड ते दोन तासांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराडजवळ गोटे गावच्या हद्दीत हॉटेल फर्न पासून काही अंतरावर अचानक आग लागली. आगीचे मोठ मोठाले लोट पसरल्याने महामार्गावर वाहतूक खोळंबली होती. तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळावरील काही लोकांनी अग्निशामक दलाच्या गाड्यांना फोन केला. यावेळी कृष्णा हॉस्पिटल व कराड नगरपालिकेच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्याचबरोबर कराड शहर पोलीस कर्मचारीही दाखल झाले होते. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या आगीच्या घटनेमुळे गोटे व मुंढे गावचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close