उत्तर महाराष्ट्रजळगावताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यलोकसभा 2024सातारासोलापूर

सातारा Loksabha : उदयनराजेंच्या जलमंदिरवर गिरीश महाजन भेटीला, नाराजीनाट्य

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीतून कोण उमेदवार असणार याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी भाजपमध्ये अंतर्गत नाराजनाट्य सुरू असल्याचे समजत असल्याने छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजप नेते ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे भेट घेतली.

सातारा लोकसभेचे तिकीट छत्रपती उदयनराजे भोसले यांना मिळू नये यासाठी भारतीय जनता पक्षातून विरोध होत असल्याचा आरोप काही दिवसापूर्वी उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच उदयनराजे भोसले हे निवडणूक रिंगणात असणार असल्याचे सांगितले असल्याने भाजपापुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. उदयनराजेंच्या भूमिकेमध्ये आणि कार्यकर्त्यांच्या आक्रमकतेमुळे गिरीश महाजन यांनी उदयनराजे यांची भेट घेतली. या भेटीत माध्यमांना बाजूला ठेवत गोपनीय चर्चा झाल्या.

साताऱ्यासह राज्यात या दोन्ही नेत्यांमधील चर्चेत काय झाली, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. माढा मतदार संघातून उफाळलेला वाद शांत करण्यासाठी मंत्री महाजन आलेले असताना. सातारा लोकसभा मतदार संघातील नाराजी नाट्यामुळे भाजप माढा आणि सातारा लोकसभा मतदारसंघात अडचणीत असल्याचे दिसत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close