ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यशैक्षणिकसांगलीसातारा

KARAD – ब्रिलियंटच्या विद्यार्थ्यांचे NDA आणि SPI परीक्षेत यश

कराड :- ब्रिलियंट #brilliant अकॅडमी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कराड या संस्थेने गेल्या ११ वर्षांत अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या विविध राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमध्ये सातत्याने उत्कृष्ट निकाल देत शिक्षणाचा उच्च दर्जा सिद्ध केला आहे. या दैदीप्यमान यशपरंपरेत एनडीए आणि एसपीआय परीक्षेतील उज्ज्वल यशाची भर घालत संस्थेने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

ब्रिलियंटचा विद्यार्थी पार्थ विनोद जामदार याने एनडीए परीक्षेत ऑल इंडिया रँक ५७ मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले असून त्याची एनडीए मध्ये निवड निश्चित झाली आहे. तसेच संस्थेच्या फाउंडेशन क्लासेसमधील विद्यार्थिनी स्वानंदी प्रकाश गोरड हिने एसपीआय नाशिक प्रवेशासाठी घेतलेल्या लिखित आणि मुलाखत परीक्षेत यश मिळवून प्रवेश मिळवला आहे.
या दोन्ही विद्यार्थ्यांचे यश सातारा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे. या विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ आयोजित भव्य सत्कार समारंभास माजी आमदार आनंदराव पाटील (नाना), दैनिक ऐक्यचे पत्रकार प्रकाश पिसाळ, संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष निसारभाई मुल्ला, सातारा जिल्हा बँकेचे माजी शाखाप्रमुख जयप्रकाश पाटील, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.दोन्ही विद्यार्थ्यांचा सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या.

एनडीए आणि एसपीए प्रवेश मिळवून देणारी सातारा जिल्ह्यातील एकमेव अकॅडमी म्हणून ब्रिलियंट अकॅडमी ओळखली जाते. पालकांनी आपल्या पाल्याच्या एनडीए आणि एसपीए प्रवेशाच्या सक्षम तयारीसाठी ब्रिलियंटची निवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
इंजिनिअरिंग, मेडिकल, रिसर्च, आर्किटेक्चर व एनडीए, होमी भाभा बालवैज्ञानिक, स्कॉलरशिप बीडीएस क्षेत्रातील हमखास यशासाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रिलियंट अकॅडमीमध्ये ५ वी ते १२ वी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, पालकांनी याचा लाभ घ्यावा.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close