kota acadamy karad
कोल्हापूरखेळताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसांगलीसातारा

कराडच्या अंजली वेताळला कुस्तीत ‘रौप्य’ पदक

हिंदकेसरी संतोष वेताळ यांची कन्या

कराड :-  मुरगुड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (SAI) कुस्ती संकुलची खेळाडू अंजली संतोष वेताळ हिने छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या 17 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. अंजलीने 61 किलो वजनगटात अटीतटीच्या लढतीत रौप्य पदक जिंकून संकुलाच्या तसेच कराडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

या ऐतिहासिक यशामागे आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक पै. दादासो लवटे सर व दयानंद खतकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणामुळेच मी राष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा निर्माण केला असल्याची भावना अंजली वेताळने व्यक्त केली.

या यशाबद्दल संकुलाचे कुटुंब प्रमुख खासदार संजय मंडलिक, कार्याध्यक्ष वीरेंद्र भैय्या मंडलिक यांनी अभिनंदन केले. अंजली ही हिंदकेसरी पैलवान संतोष आबा वेताळ यांची कन्या आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close