Hello News 2026 Ganpati Arati Book
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

कराडात युवक काॅंग्रेसचा ‘युवा आक्रोश मशाल मोर्चा’ : उद्या दहिवडीत रास्तारोको

कराड | गेल्या 9 वर्षात मोदी सरकारने दिलेली खोटी आश्वासने, वाढलेली बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, सरकारी नोकर भरती व स्पर्धा परीक्षेतील घोटाळा, महिलांवरील अत्याचार, शेतकरी विरोधी धोरण आदी फसव्या घोषणा यांचा पर्दाफाश करण्यासाठी आज युवा आक्रोश मशाल मोर्चा काढण्यात आल्याचे महाराष्ट्र युवक प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दत्त चौक येथून स्व. यशवंतराव चव्हाण समाधी पर्यंत मशाल मोर्चा काढण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदय भानू चीब, सहप्रभारी एहसान खान, प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रवक्ते दीपक राठोड, महासचिव श्रीनिवास नालमवार, प्रदेश सरचिटणीस तारिक बागवान, सातारा जिल्हा प्रभारी अनिकेत नवले, सातारा जिल्हाध्यक्ष अमरजीत कांबळे, कार्याध्यक्ष अमित जाधव, कराड दक्षिण युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिग्विजय पाटील, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अजित केंजळे, कराड उत्तर काँग्रेस कमिटी अध्यक्ष निवास थोरात, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, देवदास माने, गणेश उबाळे, राजेंद्र यादव, श्रीकांत मुळे, अभिजित चव्हाण, दिग्विजय सूर्यवंशी, मुबीन बागवान आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

शिवराज मोरे म्हणाले, आज मोदी सरकारकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. सातारा जिल्ह्यातील माण- खटाव तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे चारा छावण्या सुरू करण्याची गरज असताना त्याकडे राज्याचे सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे युवक काॅंग्रेस रस्त्यावर उतरली आहे. सरकारने शेतकरी व सामान्य लोकांच्या समस्याकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन पुकारले जाईल.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close