kota acadamy karad
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियसातारा

कराड उत्तर निवडणूक प्रमुखपदी मनोजदादा घोरपडे यांची वर्णी

सातारा | महाविजय 2024 लोकसभा प्रवासा अंतर्गत महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असता. त्यांनी कराड उत्तर निवडणूक प्रमुखपदी मनोजदादा घोरपडे यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. लोकसभेच्या निवडणुका जस- जशा जवळ येतील प्रचाराचा धुरळा उडवायला सुरुवात झालेली आहे. भारतामध्ये 2024 ला पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपाच्या सर्व राजकीय नेत्यांनी कंबर कसली असून महाराष्ट्रामध्ये 45 प्लस सीट जिंकण्यासाठी सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते सर्व जिल्ह्यांमध्ये प्रवास करत आहेत. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कराड येथे विणूताई चव्हाण सेंटर मध्ये झालेल्या कार्यक्रमांमध्ये कराड उत्तर मध्ये निवडणूक प्रमुख व प्रभारी म्हणून मनोजदादा घोरपडे हे असतील असे जाहीर केले. यावेळी अतुल भोसले, विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते.

कराड उत्तरमधून मनोजदादा घोरपडे यांना निवडून आण्यण्याचा संकल्प
निवडणूक प्रमुख हेच त्या मतदारसंघाचे उमेदवार असल्याने मनोजदादा घोरपडे यांच्या नावाची घोषणा होताच सर्व कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या निर्णयाचे स्वागत केले व कराड उत्तर मधून मनोजदादा घोरपडे यांना निवडूनच आणणार असा संकल्प केला.यावेळी जय श्रीराम, भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी संपूर्ण सभागृहात जल्लोष केला.

लोकसभा 2024 ला भारत देशामध्ये ऐतिहासिक विजय मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार प्रयत्न चालू केले आहेत. त्या अनुषंगाने 2024 ला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रमुख नेमण्यात आलेले आहेत. कराड उत्तर मधून मनोजदादा घोरपडे यांची वर्णी लागण्यामुळे सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वामध्ये लोकसभेला व विधानसभेला कराड उत्तर मधून जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल, असा विश्वास यावेळी बावनकुळे साहेब यांनी व्यक्त केला. यावेळी रामकृष्ण वेताळ, रवीजी अनासपुरे, मकरंद देशपांडे, सागर शिवदास, महेश जाधव, चंद्रकांत मदने, एकनाथ बागडी, धनंजय पाटील, विठ्ठल बलसेटवार व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close