क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

Satara News : उंदराच्या औषधाने घेतला 26 वर्षीय युवकाचा बळी

सातारा । उंदीर मारण्याकरिता विषारी  घातल्यानंतर त्याच हाताने तंबाखू मळून खाल्ल्याने विषबाधा होऊन 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील घटना असून रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात तरूणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबतची नोंद रत्नागिरी पोलिसांतून महाबळेश्वर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. उमेश धोंडिबा ढेबे (वय- 26, रा. शिंदी, महाबळेश्वर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उमेश ढेबे यांनी उंदीर मारण्यासाठी (दि. दि. 1 जुलै रोजी दुपारी औषध टाकले होते. त्याच हाताने तंबाखू खाल्ल्याने पोटात दुखू लागले. त्यामुळे त्याला प्रथम उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. तेथून अधिक उपचाराकरिता रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

या तरूणाच्या मृत्यूची अधिक चौकशीसाठी गुन्हा रत्नागिरी पोलिसांनी सोमवारी दि. 17 रोजी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात वर्ग केला. ही घटना महाबळेश्वर पोलिस ठाणे हद्दीतील असल्याने महाबळेश्वर पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेची फिर्याद गणेश धोंडीबा ढेबे (रा. शिंदी) यांनी दिली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close