क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

युवकांचे गूढ मृत्यू : एकाने पेटवून घेतले तर दुसऱ्याने गळफास

कोरेगाव | शहरात एकाच रुममध्ये 2 तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कोरेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकाने पेटवून तर दुसऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याने युवकाचे गूढ मृत्यू झाले आहेत. ऋषिकेश राजेंद्र ताटे (वय- 30), सुभाषकुमार सुरज प्रसाद (वय- 20) अशी आत्महत्या केलेल्या युवकांची नावे आहेत.

Shree Furniture karad

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील अनन्या रेसिडेन्सी मधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या दोन युवकांनी राहत्या रुममध्ये रात्रीच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास झाल्याने कोरेगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये एकाने पेटवून घेतले तर दुसऱ्या‌ने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दोघांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकले नाही.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कोरेगाव पोलीस दाखल झाले आहेत. दोन्ही तरुणाचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. याबाबतची फिर्याद रोहन राजेंद्र ताटे (वय- 25, मूळ रा. बोधेवाडी- भाडळे, ता. कोरेगाव) यांनी दिली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close