ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

मातोश्री ग्रुपच्या माध्यमातून रुग्ण सेवा करणारे नवाजबाबा खरे आरोग्यदुत : आ. निलेश लंके

Sunil Bamane

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी
समाजात वेगवेगळ्या पद्धतीचे बहुउद्देशीय सामाजिक संघटना कार्यरत असतात. यामधे अनेक संस्था या आपल्या संघटनांमार्फत विविध उत्सव साजरा करतात. परंतू आज समाजात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आरोग्य असुन याबाबत समस्या सोडविण्यासाठी विविध प्रतिष्ठाण, फाउंडेशन आदी सामाजिक संघटनांनी कराडच्या मातोश्री ग्रुपचा आदर्श घेऊन आरोग्य व रुग्ण सेवेकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. गेले तेरा वर्षांपासून मातोश्री ग्रुपचे वतीने गरजु गोरगरीबांना मोफत आरोग्य सेवा देणारे नवाजबाबा सुतार हे खरे आरोग्यदुत आहेत असे गौरवोद्गार पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले.

Sunil Bamane

कराड शहरातील आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या मातोश्री ग्रुपच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मातोश्री क्लिनिक कन्सल्टिंग सेंटरच्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते व पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी दक्ष कराडकर ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद पाटील, मनसेचे दादासाहेब शिंगण, अख्तर भाई आंबेकरी, प्रवीण पवार, शिवराज इंगवले, माजी नगरसेवक महेश कांबळे, दिलीप दादा घोडके, युवा नेते मुसद्दीक आंबेकरी, समाजसेवक प्रसाद पावसकर दादा, युवा नेते जावेद भाई नायकवडी, सैफ आतार, अभिजीत सूर्यवंशी, एनडी इनामदार, रफिक मोमीन, युवा नेते यासीन आतार, रहेबर ए जरिया फाउंडेशनचे वसीम शेख, अमीर साहब रमजान भाई मांगले कर, रियाज भाई आतार, कादर भाई नायकवडी, महेश पाटील, युवा नेते शोहेब भाई संदे, जब्बार शेख, डॉ.अनुश्री सुर्वे, डॉ. सोनाली थोरात, डॉ.अश्विनी सुपणेकर, डॉ.ऋतुजा थोरात, डॉ. मिलिंद पाटील, तोफिक मोमीन, महानंद काटेर, रोहित भोसले, अजित भोसले, गणेश खिल्लारे, चांदसाहेब निशाणदार नवाज इसाक सुतार, आसिफ भाई इबुशे, इमरान भाई मुजावर इतर परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

आ. निलेश लंके म्हणाले, समाजात दानशून व्यक्तींनी काम करणे गरजेचे असते. त्यासोबत एकत्रित आल्यास ताकद आणि कामही वाढते. अशा पध्दतीने मातोश्री ग्रुपचे समाजाभिमुख काम सुरू आहे. यावेळी आभार मातोश्री ग्रुपचे अध्यक्ष नवाज सुतार यांनी मानले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close