क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

घोरपड शिकारी प्रकरणी शेणोलीतून एकास अटक : वनविभागाची कारवाई

कराड | शेणोली स्टेशन येथील संजयनगर – गोपाळनगर (ता. कराड) येथे घोरपड शिकार करणाऱ्या एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सुनील विजय जाधव (रा.गोपाळनगर शेणोली स्टेशन) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, शेणोली स्टेशन येथील संशयित आरोपी सुनील जाधव यांनी घोरपड शिकार करून घोरपड स्वतःच्या घरी घेऊन जाऊन तिचे मटण केले. याबाबतची गोपनीय माहिती मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे यांना मिळाली. त्यांनी ती माहिती तात्काळ वनक्षेत्रपाल तुषार नवले यांना दिली. वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल आनंद जगताप, वनरक्षक कैलास सानप, शंकर राठोड, मानशी निकम, पूजा परुले,वाहन चालक योगेश बडेकर, वनसेवक भरत पवार,अमोल माने यांच्या टीम ने शिताफीने शेणोली स्टेशन येथे रात्री कारवाई केली . आरोपीस ताब्यात घेतले असून रात्री उशीरा गुन्हा नोंद करणे प्रक्रिया सुरू होती.

घोरपड शिकारी प्रकरणी 7 वर्षे कारावासाची तरतूद
घोरपड हे वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अंतर्गत शेडुल 1 भाग 1 मध्ये येते. त्याची शिकार करणे हाताळणे कायद्याने प्रतिबंधीत आहे. त्यासाठी 7 वर्षापर्यंत कारावास व 10 हजार पर्यंत कायद्यात शिक्षेची तरतूद आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close