क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

जुगार अड्ड्यावरील छाप्यात पोलिसांनी 8 जणांना घेतले ताब्यात

सातारा | पुणे- बंगळूर महामार्गावर असलेल्या अतीत (ता. सातारा) येथे एका वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 8 जणांना ताब्यात घेतले आहे. या ठिकाणाहून 2 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती बोरगाव पोलिसांनी दिली आहे.

अतीत येथे वाघ वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या शेडमध्ये काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती सपोनि रवींद्र तेलतुंबडे यांना मिळाली. यावरून पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून अजय शिवाजी कारंडे, राजेंद्र महादेव जगताप, प्रदीप कृष्णा यादव, अशोक राजाराम निकम, सुखदेव गणपती निकम, रोहित सुरेश यादव (सर्व रा. अतीत), सतीश संभाजी मोरे (रा. रामकृष्णनगर), निखिल अंगद चव्हाण (रा. आंबळे, ता. पाटण यांना ताब्यात घेतले.

जुगार अड्ड्यावरून 8 हजारांची रोकड, मोबाईल आणि दुचाकी असा 2 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हवालदार राजू शिंदे, राजेंद्र माने, संतोष चव्हाण पोना दादा स्वामी, किरण निकम, राहुल ढोणे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close