kota acadamy karad
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

पृथ्वीराज चव्हाणांनी आपल्या पाठीमागे किती आमदार यांचा विचार करावा : शंभूराज देसाई यांचा सवाल

सातारा | पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वताःच्या पाठीमागे किती आमदार आणि खासदार आहेत, हे बघावे. आमच्या नेत्याच्या स्वताः च्या पक्षाचे 50 आमदार आहेत. त्याच आत्मपरिक्षण कराव. तेव्हा बोलताना यांचा विचार करावा, अशी टीका उत्पादन शुल्क मंत्री, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

सातारा येथे शंभूराज देसाई माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजपमधील दोन दिवसात घडलेल्या प्रकारावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले होते. त्याचबरोबर भाजप आणि शिंदे गट यांच्याबाबतीत आपले मत व्यक्त केले. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की, कुणाला तरी मुख्यमंत्री करून विद्यमान मुख्यमंत्र्यांना ढकलून दिले. सध्याच्या मुख्यमंत्र्यांना दूधातल्या माशीसारखे बाजूला केले जाईल, अशा बातम्यांमुळे धोक्याचे आहेे. या वक्तव्यावर आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, आमच्या नेत्याच्या पाठीमागे 50 आमदार 13 खासदार आहेत, ते एकमुखी नेतृत्व मानतात. अजित पवार यांच्याविषयी आमचे नेते सांगतील. आम्हांला टार्गेट कामाचं आहे. भाजप कोणाजवळ जात असेल किंवा कोणी भाजपकडे जात असतील, या गोष्टीचा परिणाम आमच्या महायुतीवर होणार नाही. त्यामुळे शिवसेनेला कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close