Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्याधार्मिकपश्चिम महाराष्ट्रराज्यसांगलीसातारा

Satara News : अल्पवयीन मुलीचा विवाह लावणाऱ्या भटजीसह 8 जणांवर गुन्हा

कराड | अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यासह तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आठजणांवर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

राजेंद्र शंकर शेवाळे, बापूराव आनंदा शेवाळे, संगीता बापूराव शेवाळे (तिघेही रा. येवती- शेवळवाडी, ता. कराड), तातोबा वासो पाटील (रा. शितुर, ता. शिराळा, जि. सांगली), ताई मोरे (रा. इस्लामपूर) यांच्यासह विवाह लावणारा भटजी आणि अन्य दोघांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील भागेवाडी तालुक्यात असलेल्या एका गावातील अल्पवयीन मुलीचा 29 एप्रिल रोजी शिराळा येथे विवाह लावून देण्यात आला. त्यानंतर संबंधित मुलगी अल्पवयीन आहे, हे माहीत असूनही राजेंद्र शेवाळे याने त्या मुलीवर अत्याचार केला. तसेच इतरांनी पीडित मुलीच्या वडिलांना पैसे देऊन तिचा बालविवाह लावून दिला. याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींवर बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close