कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनब्रेकिंगराजकियराज्यसातारा

कराड शेती उत्पन्न बाजार समितीस सर्वोच्च दिलासा : संरक्षक भिंत पाडण्याच्या आदेशाला स्थगिती

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीने उच्च न्यायालयाच्या आदेशावर नाराज होवून सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या स्पेशल लिव्ह पिटिशनमध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती दिली. याबाबतची माहिती कराड बाजार समितीने दिली असून या स्थगितीनंतर व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या प्रांगणात फटाक्यांची अतिषबाजी केली.

कराड शेती उत्पन्न बाजार समितीने व्यापारी, शेतकरी, शेतमजूर व शेतमालाच्या संरक्षणासाठी समितीच्या मालकीच्या जागेत संरक्षण भिंत बांधलेली होती. परंतु काही राजकीय दबावापोटी कराड नगरपालीकेचे तात्कालीन मुख्याधिकारी यांनी दि. 14/9/2018 रोजी नोटीस देवून गेटच्या ठिकाणची संरक्षण भिंत काढून घेणेची नोटीस दिलेली होती. त्या दिलेल्या नोटीसीवर कराड बाजार समितीने उच्च न्यायालय यांचे कोर्टात जावून रिट पिटिशन दाखल करून नगरपालीकेने दिलेल्या नोटीसी प्रमाणे कार्यवाही करू नये व ती नोटीस परत घ्यावी, अशी मागणी केली होती. परंतू उच्च न्यायालयात बाजार समितीकडून काही बाबींची त्रुटी राहिल्याने बाजार समितीची मागणी नामंजूर केली होती. त्यावर नाराज होवून बाजार समितीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत स्पेशल लिव्ह पिटिशन दाखल केली.

उच्च न्यायालयात ज्या काही त्रुटी राहिल्या होत्या. त्या- त्या दाखविल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कराड नगरपालिकेस बाजार समितीस दिलेल्या नोटीसीप्रमाणे कार्यवाही करू नये असा आदेश पारीत करीत स्थगिती दिली आहे. बाजार समितीची संरक्षण भिंत पाडण्यास स्थगिती मिळाल्याचे समजताच कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बाजार समितीचे पदाधिकारी, संचालक, व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, हमाल मापाडी यांनी आनंद व्यक्त केला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close