Satara News : फळ विक्रेत्यावर हल्ला करणाऱ्या 4 युवकांना कोल्हापूरातून अटक
सातारा डी. बी. पथकाची कारवाई

सातारा | सातारा येथे उधारी मागितल्याने फळ विक्रेत्यास धारधार हत्याराने पोटात वार करून गंभीर जखमी केल्याची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबतची फिर्याद विजय गोरख ओव्हाळ (रा. प्रतापसिंहनगर- सातारा) यांनी दिली आहे. तर या प्रकरणात बॉबी अँथनी ब्रुक्स (वय- 30 वर्षे, रा. केसरकर पेठ सातारा, चंद्रकांत मनोहर जगदाळे (वय- 38 वर्षे, रा. क्षेत्र माहुली ता. जि. सातारा), सौरभ प्रविण कांबळे (वय- 25 वर्षे, रा. केसरकरपेठ सातारा), संतोष अशोक लंकेश्वर (वय- 23 वर्षे, रा. प्रतापसिंहनगर सातारा) या चार संशयित युवकांना कोल्हापूर येथून अटक करण्यात आली आहे.
याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कृष्णानगर सातारा येथे एका फळ विक्रेत्यास फळांची उधारी मागितलेचे कारणावरून चार युवकांनी मिळून मारहाण केली. तसेच धारदार हत्याराने पोटामध्ये वार केला. त्यानंतर तेथून फळ विक्रेत्यास मारहाण करून सदरचे आरोपी हे पळून गेले होते. त्यापैकी एक आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने तो मिळून येत नव्हता. त्यामध्ये सदरचा फळ विक्रेता गंभीर जखमी झाला होता. या प्रकारबाबत विजय ओव्हाळ यांनी सातारा शहर पोलीस ठाणेस जीवे मारण्याचा प्रयत्न केलेबाबतची तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. या प्रकरणी वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांचे मार्गदर्शनाखाली डी.बी पथकाने कोल्हापूर याठिकाणी जावून सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपींची कौश्यल्यपूर्वक माहिती प्राप्त करून त्यास ताब्यात घेतले. तसेच त्याचे इतर साथीदार यांना देखील ताब्यात घेवून अटक केली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, पोलीस उपअधिक्षक किरणकुमार सुर्यवंशी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांचे मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो. उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, पो.हवा. सुजीत भोसले, पो.ना. अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, विक्रम माने, पो. कॉ. संतोष कचरे, सागर गायकवाड, सुशांत कदम, गणेश घाडगे, विशाल धुमाळ, प्रसाद जाधव यांनी सदरची कारवाई केली आहे.