क्राइमताज्या बातम्यानोकरी संदर्भपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांचा दुर्देवी अंत : गोषटवाडीजवळ दोघे ठार, 1 गंभीर जखमी

पाटण | पाटण- कोयनानगर मार्गावर शुक्रवार (दि. 25) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आयशर चारचाकी गाडी व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दुचाकीवरील 2 जण ठार झाले. तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर पाटण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद रात्री उशिरा कोयनानगर पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिस भरतीची तयारी करणारे दोन्ही युवक अपघातात मृत्यू पावल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कोयना विभागातील तोरणे येथील प्रसाद आनंदा कदम (वय- 23) हे आणि प्रणय उत्तम कांबळे (वय- 22, कोयनानगर हुंबरळी), धीरज संतोष बनसोडे (वय- 18, नाशिक, सध्या रा. कोयनानगर) असे तिघे दुचाकीवरून निघाले होते. गोषटवाडी गावाजवळ वळणावर समोरून आलेल्या आयशर टेम्पोची आणि दुचाकीची जोरदार धडक बसली. यात तिघेही रस्त्यावर कोसळले. या अपघातात दुचाकीवरील धीरज संतोष बनसोडे हा युवक जागीच ठार झाला. तर प्रणय उत्तम कांबळे याला उपचारासाठी गाडीतून नेत असताना त्याचा मृत्यू झाला. दुचाकी चालक प्रसाद कदम हा जखमी झाला असून त्याच्यावर पाटण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिस भरतीची तयारी करण्यासाठी रनिंग करण्यासाठी गेलेल्या दोन्ही युवकांचा मृत्यू झाल्याने कोयना परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर अत्यंत भयानक चित्र घटनास्थळी होते. कोयनानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी दाखल केले. तर सदरील घटनेतची नोंद रात्री उशिरा कोयनानगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker