Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसांगलीसातारा

कराड पोलिसांनी मोबाईल चोरट्याच्या शोधासाठी 250 सीसीटीव्ही तपासले : पाच राज्यातून प्रवास

कराड (हॅलो न्यूज) – कराड शहरातील एस एस मोबाईल शॉपीचे शटर तोडून सुमारे ३० लाख रुपये किमतीचे मोबाईल संच चोरून नेणाऱ्या टोळीतील दोघांना कराड शहर पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत कर्नाटकातील वस्कोटी, जि. बंगळूर परिसरातून दोघांना ताब्यात घेतले. अब्दुलहाय वशीरअहमद (वय ५१) याला रा. बावला, ता. नूंह, जि. नूंह मेवात, हरियाणा, अलाऊद्दीन जहरुद्दीन (वय ३१) रा. न्हेलहांडा, ता. जेवर, जि. गौतमबुद्धनगर, उत्तर प्रदेश या दोघांना कर्नाटक मधून ताब्यात घेऊन अटक करण्यात आले. पोलिसांनी या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री दोनच्या सुमारास येथील एस एस मोबाईल शॉपीचे शटर तोडून चोरट्यांनी दुकानातील नवीन मोबाईल संच लंपास केले होते. या धाडसी चोरीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेनंतर पोलिसांनी दुकान व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपींनी स्विफ्ट कारचा वापर केल्याचे स्पष्ट झाले. ही कार शमगाव घाट मार्गे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वाहनाचा माग काढण्यास सुरुवात केली. कराड शहर पोलीस ठाण्याचे डी.बी. पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी समन्वयाने तपास करत संशयितांचा माग काढला. तपासादरम्यान आरोपींचे वास्तव्य हरियाणा व राजस्थान परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून ट्रकच्या माध्यमातून चोरीचा माल हरियाणा व राजस्थान येथे पाठविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कराड शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम व त्यांच्या पथकाने दि. ३० ऑगस्ट रोजी कर्नाटक गाठले. दि. ३१ ऑगस्ट रोजी अब्दुलहाय वशीर अहमद आणि अलाऊद्दीन जहरुद्दीन यांना कर्नाटकात ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. चोरीतील मोबाईल संच व अन्य मुद्देमालाबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू असून, या गुन्ह्यामागील संपूर्ण टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी तपासाला वेग देण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपअधीक्षक राजश्री पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विश्वजीत घोडके आणि कराड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सातारच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि कराड शहर पोलिसांच्या पथकांनी शामगाव घाटापासून अहिल्यानगरपर्यंत सुमारे २०० ते २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. आरोपींनी टोलनाके टाळून प्रवास केला होता. मात्र पोलिसांनी सीडीआर, एसडीआरसह तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत आरोपींचा माग काढला. यामध्ये दोघांना अटक केली असून अन्य आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाले आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close