kota acadamy karad
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

Video गाैतमी पाटीलचा राडा : आ. शिवेंद्रराजें वाढदिवासानिमित्त जावलीत थिरकले

जावली माझी माऊली, जीची माझ्यावर प्रेमाची सावली

सातारा | जावली माझी माऊली, जीची माझ्यावर प्रेमाची सावली. माझे सहकारी हीच माझी ताकद आहे. शेवटपर्यंत माझ्या जावली तालुक्यासाठी मी लढत, भांडत राहीन. परंतु आता तुमचा वेळ घेणार नाही, कारण तुमच्या सगळ्याचे लक्ष फक्त एकच सबसे कातील, गाैतमी पाटील एवढचं आहे. अशी डायलाॅगबाजी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.

यावेळी वसंतराव मानकुमरे, राजू भोसले यांच्यासह जावली तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. शिवेंद्रराजे यांच्या हस्ते गाैतमी पाटील यांना साडीचोळी देवून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास तरूणाईंने मोठी गर्दी केली होती. प्रेक्षकांसाठी लावण्यात आलेले लोखंडी ग्रील काही हुल्लडबाज प्रेक्षकांनी मोडले. यावेळी काही युवकांना काठीचा प्रसादही खावा लागला.

सातारा- जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा 30 मार्च रोजी वाढदिवस आहे. परंतु त्या अगोदर 2 दिवस जावली तालुक्यात गाैतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्टेजवर कार्यकर्त्यांच्या आग्रहखातर आ. भोसले थिरकताना पहायला मिळाले. सध्या या कार्यक्रमाचे व्हिडिअो सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसून येत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close