भाजप काँग्रेस युक्त होतोय :- हर्षवर्धन सपकाळ
कराड येथे यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन

कराड :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील स्मृतिस्थळी अभिवादन केले. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश कार्यकारणीचे रणजितसिंह देशमुख श, अजितराव पाटील- चिखलीकर,
काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात, माजी नगरसेवक प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, अमित जाधव, रणजित देशमुख, शेरखान पठाण आदींची उपस्थिती होते.
भाजप काँग्रेस युक्त
काँग्रेसमुक्त भारत करता करता भाजप काँग्रेस युक्त झाला असून अजूनही काँग्रेस संपलेली नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपाला टोला लगावला.
दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आनंदच
काँग्रेसची भूमिका ही नेहमी भारत जोडो ची राहिलेली आहे. त्यामुळे दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या, दोन कुटुंबे एकत्र आली तर आम्हाला आनंद होईल.
आघाड्यामुळे काँग्रेसचे नुकसान
गतकाळात आघाडीची अपरिहार्यता होती. त्यामुळे राजकारणात आम्हाला आघाडी करावी लागली. त्याचेच मोठे नुकसान आम्हाला सोसावे लागले.
महात्मा गांधीजींची हत्या हा देशातला पहिला दहशतवादी हल्ला
काँग्रेस हा सव्वाशे वर्षांचा पक्ष असून काँग्रेसला ज्वाजल्य इतिहास आहे. काँग्रेसनेच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. काँग्रेसच्या दोन पंतप्रधानांनी बलिदान दिलं. हा इतिहास काही लोक विसरत आहेत. महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्लाच होता, असं खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं.