kota acadamy karad
कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

भक्ष्याच्या शोधात वराडे गावात घुसले पुन्हा 3 बिबटे ; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

उंब्रज | कराड तालुक्यातील वराडे गाव बिबट्यांच्या दहशतखाली आहे. शुक्रवारी (दि. 18) आॅगस्ट रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात आलेले तीन बिबटे गावात फिरत होते. ही संपूर्ण घटना गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभाग व प्रशासकीय पातळीवर कोणत्यांच उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थ हवालदील झाले आहेत. घराबाहेर कसे पडायचे या चिंतेत ग्रामस्थ आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, वराडे तालुका कराड येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात शुक्रवारी पहाटे तीन बिबटे कैद झाले. मागील पंधरा दिवसांपुर्वी याच परिसरात असणाऱ्या आनंदराव जाधव यांच्या घरासमोर बांधलेले पाळीव कुत्रे बिबट्याने फस्त केले होते. त्यानंतर एमआयडीसीतील दोन वासरे व एक कुत्रे फस्त केले. अनेक महिन्यांपासून डोंगर परिसरात बिबट्यांचा वावर आहे. मात्र, आता बिबटे लोक वस्तीत वावरू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावातील सीसीटीव्ही कॅमेरात तीन बिबटे एकत्रितपणे गावात शिरल्याचे दिसून वारंवारं आले आहे. त्यामुळे लोकांची पाचावर धारण बसली आहे. लहान मुले व जनावरे सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान गावकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. वन विभागाचे स्वतंत्र कार्यालय वराडे येथे आहे. मात्र, कोणत्याही हालचाली होत नाहीत. तेव्हा आता माणसांवर हल्ला केल्यावरच यंत्रणेला जाग येणार का असा सवाल उपस्थित केला जावू लागला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close