kota acadamy karad
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसातारासोलापूर

ज्योतिषाकडून मुहूर्त काढून 1 कोटीचा दरोडा टाकला : सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील आरोपी

बारामती | ज्योतिषाकडून मुहूर्त काढला जातो तो म्हणजे एखाद्या शुभ कार्यासाठी काढला जातो. मात्र, तुम्ही कधी ऐकले नसेल असा प्रकार सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील बहाद्दरांनी केली आहे. तब्बल एक कोटीचा दरोडा टाकण्यासाठी ज्योतिषाकडून मुहूर्त काढला अन् चोरट्यांचा डावही यशस्वी झाला. यामुळे या चोरीची चांगलीच चर्चा सध्या पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहे.

बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवकाते नगर येथील महिलेचे हातपाय बांधून तिला मारहाण करत तब्बल 1 कोटी 7 लाख रुपयांचा दरोडा चोरट्यांनी टाकला होता. सागर शिवाजी गोफणे हे पत्नी तृप्ती व दोन मुलांसह देवकाते नगर येथे राहतात. सागर हे तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी तृप्ती व मुले घरी होती. चोरट्यांनी रात्री 8 वाजताच्या सुमारास गोफणे यांच्या घराच्या कंपाउंडवरून घरात प्रवेश करत तृप्ती यांना मारहाण केली. तसेच त्यांचे हात-पाय बांधून त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून 95 लाख 30 हजाराची रोख रक्कम, 11 लाख 59 हजार रुपयांचे 20 तोळे दागिने, 35 हजार रुपयांचा मोबाईल असा 1 कोटी 7 लाख रुपयांचा ऐवज चोरला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.

याबाबत प्रकरणात सचिन जगधणे (वय- 30, रा. गुणवडी, 29 फाटा, ता. बारामती), रायबा चव्हाण (वय- 32, रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर), रविंद्र भोसले (वय- 27, रा. निरावागज, बारामती), दुर्योधन जाधव (वय- 35, रा. जिंती, ता. फलटण, जि. सातारा), नितीन मोरे (वय- 36, रा. धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्यासह रामचंद्र वामन चव्हाण (वय- 43, मूळ रा. आंदरुड, ता. फलटण, जि. सातारा) अशी या दरोड्यातील आरोपींची नावे आहेत. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. परंतु पोलिसांनी गोपनीय खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून संशयित चोरट्यांना अटक केली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close