ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारासामाजिक

वीर पत्नीचा सन्मान : राष्ट्रवादी माजी सैनिक सेलची महाप्रबोधन यात्रा

मसूर प्रतिनिधी | दादासाहेब काशिद
सैनिकांबाबतचे वेगवेगळे कार्यक्रम राबवून समाजाची दिशाभूल करण्याचे उद्योग सध्याच्या सरकारचे सुरू आहेत. असे डाव समाजाणे जागृत राहून वेळेत हाणून पाडले नाही, तर देशासाठी येणारा काळ अतिशय विघातक स्वरूपाचा असेल. असे प्रतिपादन राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दीपक राजेशिर्के यांनी केले.

यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्री साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याचे आैचित्य साधून राष्ट्रवादी माजी सैनिक सेलच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व माजी सैनिकांचे मार्गदर्शनपर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अॅड. संभाजीराव मोहिते, माजी सैनिक सेलचे प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, प्रदेश संघटक वसंत आजमाने, उपाध्यक्ष पोपटराव पडवळ, सह संघटक तात्याराव मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Shree Furniture karad

यावेळी संभाजीराव मोहिते यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन चरित्रावर अतिशय मौलिक असे व्याख्यान सादर केले. तसेच मुंडे गावचे सुपुत्र शहीद जवान संदीप सावंत यांच्या वीर पत्नी स्मिता सावंत यांचा सैनिक सेलच्या वतीने सन्मान करण्यात आला. सेलच्या काही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रही यावेळी देण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी मनोगत व्यक्त केले. सह्याद्री कारखान्याचे संचालक जशराज पाटील, माणिकराव पाटील, शालन माळी, तसेच संगीता साळुंखे, माजी सभापती प्रणव ताटे,पांडुरंग चव्हाण नंदकुमार बटाने आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मानसिंगराव जगदाळे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन जयवंत साळुंखे यांनी केले. आभार देवराज पाटील यांनी मानले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker