क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

पाटण तालुक्यातील तिघांना अटक : वाहनांसह 19 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त

पाटण | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कराड- चिपळूण मार्गावर पाटण तालुक्यातील गोषाटवाडी हद्दीत कारवाई करत गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह सहा चाकी व चार चाकी वाहन असा एकूण 19 लाख 75 हजार 400 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक किर्ती शेडगे यांनी दिली.

कराड व पाटण तालुका परिसरात गोवा बनावट दारुचा पुरवठा करणारे सदर गुन्ह्यातील व्यक्ती गोरखनाथ बाबुराव पवार (रा.बेलवाडे खुर्द, ता.पाटण), प्रदीप कृष्णात सलते (रा. मु. सलते पो. बीबी ता.पाटण) व दिनेश दगडू कदम (रा. वालोपे ता. चिपळूण जि. रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

या कारवाईमध्ये एकूण 25 बॉक्स गोवा बनावट दारु, एक सहाचाकी वाहन, दुधाची 553 कॅरेट तसेच एक चारचाकी वाहन असा एकूण रुपये 19 लाख 75 हजार 400 किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन 3 आरोपीं विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक किशोर नडे, प्रशांत नागरगोजे, विनोद बनसोडे व महिला जवान राणी काळोखे, मनिष माने, आबासाहेब जानकर, राजेंद्र आवघडे यांनी सहभाग घेतला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close