उत्तर महाराष्ट्रकोकणक्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंग

Breaking News: पार्किंगमध्ये लागलेल्या भीषण आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू तर 51 जण जखमी

मुंबई। गोरेगावमधील जय भवानी इमारतीला मध्यरात्री लागलेल्या पार्किंगमधील भीषण आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.  लोक गाढ झोपेत असताना 3 वाजता लागलेल्या या भीषण आगीत 51 जण जखमी झाले असून त्यातील 5 जण गंभीर जखमी आहेत. या आगीमुळे सोसायटीतील 40-50 रहिवाशी गुदमरले असून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मध्यरात्री लागलेली ही आग नियंत्रणात आली आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान कुलिंग ऑपरेशन करत आहेत.

गोरेगाव पश्चिमेच्या उन्नतनगरमधील 8 मजली इमारत असलेल्या पार्किंगमध्ये तळमजल्याला ही आग लागली आहे. अग्निशामक दलाला 3 तासात आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. या आगीत सोसायटीतील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग लागली तेव्हा सोसायटीतील सर्व लोक गाढ झोपेत होते. त्यावेळी आग लागल्याने या लोकांचा होरपळून मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, मृतांमध्ये 3 मुले, 3 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तर 31 जण जखमी झाले आहेत. त्यातील 14 जण गंभीर जखमी आहेत. या आगीत पार्किंगमधील 30 दुचाकी आणि 4 कार जळून खाक झाल्या आहेत. या आगीमुळे पसरलेल्या धुरामुळे 40 ते 50 जणांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे या सर्व रहिवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker