कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनब्रेकिंगराज्यसांगलीसातारा

कोयना धरण ते हरिपूरपर्यंत पाणी उपसा बंदी आदेश : शेतकरी, व्यावसायिकांनो भंग केल्यास कारवाई

कोयना धरणात अवघा 10. 44 टीएमसी पाणीसाठा

सांगली – साताऱ्यातील कोयना धरणातील पाणीसाठा कमी होत असून सध्या धरणात 10.44 टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठी असल्याने सातारा व सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवर कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत  महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 मधील कलम 11 व 49 मधील तरतुदीनुसार आजपासून पुढील चार दिवस कृष्णा नदीतून शेतीसाठी तसेच खाजगी तसेच औद्योगिक कारणांसाठी पाण्याचा उपसा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसा पाणी उपसा बंदीचा आदेश काढण्यात आला आहे. या आदेशाचा भंग केल्यास शेतकरी आणि व्यावसायिकांवर कारवाई होणार आहे.

कृष्णा नदीतून उपसा बंदीचा आदेश सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी काढला आहे. नदीतील पाण्याचा वापर पिण्यासाठीच करावा. इतर कारणासाठी पाणी उपसा केल्यास अनाधिकृत समजून पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षाच्या कालावधी करता रद्द करण्यात येणार आहे. तसेच उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारी सामग्री जप्त करण्यात येणार असल्याचे उपसा बंदी या आदेशात म्हटल आहे.

तसेच कोयना धरणातील मर्यादित पाणीसाठ्याचा विचार करून बिगर सिंचन पाणी वापर करताना सांडपाणी विशेषता औद्योगिक म्हणजे व्यवसायिक असणाऱ्या वापरातील पाणी थेट नदीपात्रात सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. नदीतील पाणी प्रदूषित करू नये कारण प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नसल्याने सांडपाणी पाण्यात सोडण्याचे टाळावे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close