खेळताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारासामाजिक

तांबवेत होम मिनिस्टरमध्ये संगीता पवार पैठणीच्या मानकरी

कराड-  तांबवे येथील हनुमान गणेश मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित होम मिनस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमात संगीता पवार यांनी पहिल्या क्रमाकांची पैठणीच्या मानकरी ठरल्या. दुसऱ्या क्रमाकांची तेजल सुजित मोरे तर तिसऱ्या क्रमाकांची अंजली राजकुमार पाटील यांनी पैठणी जिंकली.

हनुमान गणेश मंडळाच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याने विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्या सहकार्याने महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम पार पडला. प्रा. मिथुन माने आणि गणेश चिंचकर यांनी महिलांसाठी अनेक स्पर्धा राबवल्या. या खेळात 100 हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला.

खेळ पैठणीचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सिमा पाटील, माधुरी पाटील, धनश्री पाटील, अमृता पाटील, दिपाली पाटील, अश्विनी पाटील, शिला पाटील, अंजली पाटील यांच्यासह महिला सभासदांनी सहकार्य केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close