Shekar Patil Maqheshwari Infra 1
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनब्रेकिंगराज्यसातारासामाजिक

उत्कृष्ट पोलीस पाटील गाैरव : सुपने येथील कमलेश कोळी यांचा आयजीच्या हस्ते सन्मान

कराड (हॅलो न्यूज) :- पोलीस प्रशासनाशी समन्वय साधत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच समाजहितासाठी उल्लेखनीय व कर्तव्यदक्ष कामगिरी केल्याबद्दल कराड तालुक्यातील दोन पोलीस पाटलांचा उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून गौरव करण्यात आला. वाठार येथील ज्योती प्रवीण शिंदे आणि सुपने येथील कमलेश विष्णू कोळी यांची वर्ष २०२५-२६ साठी कराड तालुक्यातून उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून निवड झाली.

सातारा येथे झालेल्या कार्यक्रमात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते दोघांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, कराडच्या DYSP राजश्री पाटील, कराड शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ, खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस पाटील उपस्थित होते. या सन्मानाबद्दल कराड तालुक्यातील पोलीस पाटील बांधवांकडून दोघांचे अभिनंदन करण्यात आले.

श्री कालिकादेवी पतसंस्थेचा 15 टक्के लाभांश जाहीर : चेअरमन राजन वेळापुरे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close