कराड उत्तरच्या रस्त्यासाठी 425 कोटींचा विकासनिधी मंजूर
कोरेगाव ते कराड तालुक्यातील या रस्त्याचे होणार क्राॅंक्रीट

कराड :- कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे. पुसेसावळी -गोरेगाव ते सातारा जिल्हा हद्द व बनवडी फाटा- ओगलेवाडी- टेंभू -कोरेगाव या महत्त्वाच्या रस्त्याला काँक्रीटीकरणासाठी तब्बल 139 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.
आमदार मनोज घोरपडे यांच्या पाठपुरावा यश आले आहे. कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे आमदार अतुलबाबा भोसले यांच्या सहकार्याने या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
या मार्गावरील प्रवास सुखकर होणार असून या काँक्रीट रस्त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. तसेच अपघाताचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील कृषी माल बाजारपेठेपर्यंत जलद पोहोचल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. तसेच पर्यटकांचा ओघ वाढल्याने स्थानिक व्यवसायांनाही चालना मिळणार असल्याचे आ. घोरपडे यांनी सांगितले.
कराड उत्तरच्या प्रगतीसाठी महायुती सरकार कटिबद्ध
राज्य शासनाच्या माध्यमातून रहिमतपूर- कराड रस्त्यासाठी 286 कोटीचा निधी उपलब्ध झाला होता. त्यातील 139 कोटीचा निधी उपलब्ध झालेला आहे. कराड उत्तरच्या रस्त्यांसाठी एकूण 425 कोटीचा भरघोस निधी मिळालेला आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये हॅमच्या माध्यमातून मतदार संघातील चार ते पाच मोठे रस्ते मंजूर करण्यात येणार आहेत.
– आमदार मनोजदादा घोरपडे, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ



