कराड सोलर ऊर्जा
कोल्हापूरक्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेब्रेकिंगसांगलीसातारा

सातारा जिल्ह्यात चोरी पुण्यात सापडला : एक शोधायला गेले अन् 10 दुचाकी सापडल्या

बोरगाव पोलिसांची कामगिरी

सातारा :- अतित येथून चोरीला गेलेली एक मोटार सायकल शोधायला गेले अन् चक्क 10 मोटार सायकली सातारा तालुक्यातील बोरगांव पोलिसांना सापडल्या आहेत. तसेच चोरट्यासही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.मोटर सायकलसह आरोपी रविराज ऊर्फ बबलु विलास माने (वय २५ वर्षे रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव सध्या रा. अप्पर डेपो, साईनगर, खंडोबानगर, बिबवेवाडी, पुणे) या संशयिताचा पाठलाग करून त्यास शिताफीने ताब्यात घेऊन त्यास अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारे मोटरसायकल ही चोरीस गेलेनंतर ५ तासात मोटरसायकल चोरी उघड केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२७/०६/२०२६ रोजी दुपारी २.४५ वा. चे सुमारास युवराज कृष्णाजी लोहार (वय- ४४ वर्षे रा. गोविंद रेसिडेन्सी फ्लॅटनं. १२ शाहूनगर गोडोली सातारा ता.जि. सातारा) यांचे मालकीची मोटरसायकल होंडा कंपनीची CB HORNET 160 मोटरसायकल तिचा MH 11 CF 5183 ही मोटरसायकल अतित ता.जि. सातारा श्री मोटर्स बॉडीशॉपसमोरून चोरी गेलेने त्यांनी दि.२७/०६/२०२६ रोजी पोलीस ठाणेस तक्रार दिली. सदर चोरी केलेल्या मोटारसायकलबाबत तात्काळ प्रभारी अधिकारी श्री. प्रशांत हुले सहा. पोलीस निरीक्षक बोरगांव पोलीस ठाणे यांना मिळाले गोपनिय बातमीचे आधारे गुन्हयातील चोरीस गेली मोटार सायकल व आरोपी यांचा पोलीस ठाणे हद्दीत शोध घेत घेणेकामी डी.वी. पथक यांना रवाना केले व पथकाने मिळाले गोपणीय बातमीचे आधारे सदर गुन्हयांत चोरीस गेलेल्या मोटर सायकलसह आरोपी रविराज ऊर्फ बबलु विलास माने वय २५ वर्षे रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव सध्या रा. अप्पर डेपो, साईनगर, खंडोबानगर, बिबवेवाडी, पुणे या संशयिताचा पाठलाग करून त्यास शिताफीने ताब्यात घेऊन त्यास अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारे मोटरसायकल ही चोरीस गेलेनंतर ५ तासात मोटरसायकल चोरी उघड केली आहे. अटकेदरम्याण आरोपीने सातारा तालुक्यातील तसेच पूणे शहरातून मोटरसायली चोरी केलेची कबूली दिली. त्याच्यकडून पोलीस कोठडी रिमांड दरम्याण किं. रु.३,९२,०००/- च्या १० मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत..

1) बोरगाव पोलीस ठाणे ११४/२०२६, बी.एन.एस क-३०३ सदरील चोरीत २०,०००/-रु. हिरो कंपनीची डिलक्स मो.के.MH-50 G-8572.
2) बोरगाव पोलीस ठाणे १९४/२०२६, बी.एन.एस क-३०३ (२) मिळाला माल -६०,०००/-रु. होंडा कंपनीची CB HORNET 160R MH 11 CF 5183
3) बोरगाव पोलीस ठाणे१९८/२०२६ बी.एन.एस क-३०३ (२) मिळाला माल ८०,०००/-रु. अॅक्टीव्हा डिलक्स क्र. HMH-11-DG-7651
4)) बोरगाव पोलीस ठाणे १९९/२०२६ बी.एन.एस क-३०३ (२) मिळाला माल ६००००/-रु. होंडा शाईन मो.सा.क्र. MH-14FH-6583 5)मार्केडयार्ड पोलीस ठाणे १३३/२६बी.एन.एस क-३०३ (२) मिळाला माल १२,०००/- होंडा कंपनीची सीबी टिव्हीस्टर मो.क्र. MH-12-CB-5109
6) मार्केडयार्ड पोलीस ठाणे १३८/२६ बी.एन.एस क-३०३ (२) मिळाला माल ३५,०००/- स्पेल्डंर मो.सा. MH-12-FW-3394 ७) विश्रामबाग पोलीस ठाणे ११३/२०२६ बी.एन.एस क-३०३ (२)
7) माल ३५,०००/- CB HORNET 160R मो. सा. क्रं.MH-47-S-1056
8) स्वारगेट पोलीस ठाणे २१३/२०२६ बी.एन.एस क-३०३ (२) मिळाला माल -१५,०००/- स्पेल्डर मो.सा.क्र. MH-12-KD2429
9) शिवाजीनगर पोलीस ठाणे १५७/२०२६ बी.एन.एस क-३०३ (२) मिळाला माल -२५,०००/- अॅक्टीव्हा मोटार सायकल क. MH-12-LU-0463
10) गुन्हा नोंद नाही २५,०००/- बजाज कंपनीची सीटी-१०० मोटार सायकल क्र. MH-12-CJ-4018

सदरची कारवाई निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा, डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा, मा. विपुल पाटील सो,उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा शहर विभाग सातारा यांचे मार्गदर्शनाखाली बोरगांव पोलीस ठाणे प्रभारी प्रशांत तुकाराम हुले, सहा. पोलीस निरीक्षक, मंच्छिद्र एकनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक, सत्यवान बसवंत, पोलीस उपनिरीक्षक, रफिक काझी सहा. पो. फौजदार, पो. हे. कॉ. संतोष चव्हाण, संजय खाडे, पो. हे. कॉ. निलेश गायकवाड, दिपककुमार मांडवे, पो. ना. प्रशांत चव्हाण, जगदीश कणसे, रफिक शेख, पो.कॉ. धीरज महाडीक, केतन जाधव, सतिश पवार, विशाल जाधव, दिपक देशमूख, समाधान जाधव, सुमित साळुंखे, अनिकेत यादव, ज्ञानेश ढाणे यांनी केली आहे. आरोपीचे नाव (१) रविराज ऊर्फ बबलु विलास माने वय २५ वर्षे रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि.धाराशिव सध्या रा.अप्पर डेपो, साईनगर, खंडोबानगर, बिबवेवाडी, पुणे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close