
कराड :- विद्यार्थ्यांनी सातवी पासूनच यूपीएससी, एमपीएससी, सीजीएल सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा कोटा अकॅडमीचा (Kota Academy) आयएएस (IAS) फाउंडेशन हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल, कराडचे माजी खासदार व माजी सनदी अधिकारी श्रीनिवास पाटील यांनी केले.
कोटा अकॅडमीच्या आयएएस फाउंडेशन या कोर्सच्या माहिती पत्रकाच्या अनावरण प्रसंगी त्यांनी असे सांगून कराड व परिसरातील शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले. यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांना इयत्ता सातवी ते अकरावी चा अभ्यासक्रम असतो. त्याची तयारी आत्तापासून केली तर विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच लाभ होईल असे ते यावेळी म्हणाले.
विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना या उपक्रमाची माहिती द्यावी, असे त्यांनी यावेळी मैथिली खुस्पे यांना सांगितले. गेली 20 वर्षे कोटा अकॅडमी कराड मध्ये कार्यरत असून त्यांनी अनेक डॉक्टर्स व इंजिनिअर्स घडवलेत. यासाठी त्यांनी कोटा अकॅडमीचे अभिनंदन केले. या उपक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या व उपस्थित असलेल्या कोटा अकॅडमीच्या डॉ. महेश खुस्पे, सौ. मंजिरी खुस्पे, कु. मैथिली खुस्पे यांचे या सुंदर उपक्रमाबद्दल अभिनंदन केले. कराड मधून भारताचे भवितव्य घडवणारे उत्तम अधिकारी बनतील, अशी आशा माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली.



