
हॅलो न्यूज | पालकमंत्री पदावरून नाराजी सुरू असतानाच एक अत्यंत महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील (दादा) यांना पुण्याच्या पालकमंत्री पदावरून हटवून त्याठिकाणी अजित पवार यांना पालकमंत्री देण्यात आले आहे. रायगड आणि सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा निर्णय अद्याप झाले नाही. मात्र, आज राज्यातील 11 जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का याकडे लक्ष लागून असणार आहे.
गेल्या काही दिवसापासून शिवसेना- राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरू होती. यामध्ये अजित पवार (पुणे), राधाकृष्ण विखे- पाटील (अकोला), विजयकुमार गावित (भंडारा), दिलीप वळसे- पाटील (बुलढाणा), चंद्रकांत पाटील (सोलापूर, अमरावती), हसन मुश्रीफ (कोल्हापूर), धनंजय मुंडे (बीड), धर्मबाबा अत्राम (गोदिया), सुधीर मुनंगटीवार (वर्धा), संजय बनसोडे (परभणी), अनिल पाटील (नंदुरबार) यांना पालकमंत्री देण्यात आली आहेत. तानाजी सावंत यांच्याकडून परभणी काढून घेण्यात आले आहे.
दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्यानंतर आज पालकमंत्री पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. अजित पवार यांच्या गटाकडून रायगड आणि सातारा पालकमंत्री पदाची मागणी करण्यात आली होती. भाजपचे चंद्रकांत दादा यांची पुण्यातून उचलबांगडी करण्यात आली. अदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्याचा दावा केला होता. परंतु , अद्याप या जिल्ह्याचा निर्णय राखीव ठेवलेला दिसत आहे.